नावापुरता शरीफ

पाकिस्तानचे वेळेआधीच मावळलेले पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात फक्त नावा पुरताच  शरीफपणा उरला आहे.पाकिस्ताच्या सुप्रीम कोर्टाने त्यांना पनामा मनी लाँड्रीग प्रकरणी दोषी ठरविले त्यामुळे त्यांना राजीनामा देणे भाग पडले.या प्रकरणात शरीफ जास्त अडकले ते त्यांची कन्या मारियामामूळे;तिने बचावासाठी JIT(JOINT INVESTIGATION TEAM) समोर दस्तावेज सादर केले  आणि तिथे तिने एक तांत्रिक चूक केली ती म्हणजे २०१७ मध्ये २००६ चे खोटे दस्तऐवज तिने बनवून न्यायालयाच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचा प्रयत्न केला परंतू २००६ ला calibre फॉन्ट अस्तित्वातच नव्हता मग मारियामने सादर केलेल्या दस्ताऐवजामध्ये हा फॉन्ट कसा काय? असा प्रश्न उपस्थित झाल्यावर शरीफ परिवार पूर्णपणे अडचणीत आला. नवाज शरीफ यांच्या राजीनाम्या नंतर पाकिस्तानी छाती ठोकून अभिमानाने सांगत आहेत ,हा तर पाकिस्तानच्या लोकशाहिचा विजय !अरे ज्या देशात पार्श्वसंगीत लष्कराचं वाजत आहे त्या देशात लोकशाहीच गाणं कुठून आलं?
         नवाज शरीफ यांना पंतप्रधान पद सोडणे हे काही त्यांच्यासाठी नवीन नव्हते यापूर्वी दोनदा त्यांना वजीर-ए-अझमच्या सिंहसनावरून उठावे लागले होते. १९९० मध्ये पहिल्यांदा नवाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान बनले पण त्यानंतर १९९३ मध्ये जगभरात विविध ठिकाणी बेनामी संपत्ती खरेदी केल्याप्रकरणी त्यांना पदावरून हटविण्यात आले. १९९७ ला पुन्हा एकदा पंतप्रधान बनले आणि १९९९ मध्ये सत्ता परिवर्तन झाल्यामुळे शरीफ यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.तद्नंतर २०१३ ला पहिल्यांदा लोकांनी शरीफ यांना पंतप्रधान बनविले आणि पुन्हा एकदा आपण शरीफ नसल्याचे दाखवून दिले आणि त्यामुळे त्यांना हा राजीनामा द्यावा लागला.
     पाकिस्तानच्या गेल्या ७१ वर्षमध्ये एकही पंतप्रधान आपला ५ वर्षचा कार्यभार पूर्ण करू शकलेला नाही आहे आणि याला ते लोकशाहीच गोंडस नाव देऊन निभावून नेतात. सर्वात कमालीची गोष्ट म्हणजे त्यांच्या पहिल्या १० वर्षात एकूण ७ पंतप्रधान आले आणि गेले.आतांकवाद्यांकडून दुसरं काय अपेक्षित असणार?
     नवाज शरीफ यांच्या बाबतीत मग आपल्याला असं म्हणता येईल उघड झाला पनामा आणि द्यावा लागला राजीनामा.राजीनाम्याचे पनामा हे तत्कालीन कारण होते .त्यांच्या राजीनाम्याची पाळंमुळं आधीच रोवली गेली होती .भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी -शरीफ भेटीमुळे पाकिस्तानी लष्कराच्या मनात नवाज शरिफाबद्दल प्रचंड असंतोष निर्माण झाला होता.इम्रान खानचा देखील प्रखर विरोध हा शरीफ राजवटीवर होता.या सगळ्याचा लेखा जोखा म्हणजे हा राजीनामा.
      शरीफ  यांची जरी सत्तेवरून  हकालपट्टी झाली असली तरी निवडणूका लढविण्यासाठी लागणारा पैसा आणि राजकारणाचा सखोल अनुभव त्यांच्याइतका पाकिस्तानात दुसरा कोणाकडेही नाही.या आधीही पाकिस्तान मध्ये पंतप्रधान आले अमाप लुटलं आणि गेले.

Comments