मुक्काम पोस्ट

*तिला ती अन त्याला तो*

तर मुक्काम पोस्ट
साधी सोपी कठीण गोष्ट...!!

ती आणि ती
तो आणि तो..!

थोडं ऐकायला
     विचित्र
पण सत्य चित्रं..!

समाज नाही काही
       मानत..
त्यांच्या भावना कण्हत..!!

तिला ती आवडते
त्याला तो आवडतो
आणि त्या दोघांना
     तो अडवतो...

समाज देणं
बुरखा पांघरूण
असतो सदैव टीमक्या
मिरवीत...

समलैंगिक समजलैंगिक
भावना ऐच्छिक ..
तिची तिच्याबद्दल अन
त्याची त्याच्याबद्दल..!

नैसर्गिक अनैसर्गिक
वाद विवाद मांडती
तथाकथित मंडळी...!
हाती न लगे काही...!!

यत्र तत्र सर्वत्र
थोडं ऐकायला
     विचत्र
पण सत्य चित्रं....!!

थांबवू विचार अनिष्ट
समजून ,
मुक्काम पोस्ट
साधी सोपी कठीण गोष्ट...!!!

©समीर गुडेकर

Comments