वेळेचे बंधन पाळणे म्हणजे ससेहोलपट होणे साहजिकच आहे.हे मला माझ्या आयुष्यातील अनेक घटनांचे सिहांवलोकन केल्या नंतर प्रकर्षणाने जाणवले. असो पण "वेळेत काम करणे म्हणजे डोक्याला शॉट." ही इतकी साधी आणि सरळ गोष्ट सांगण्यासाठी ससा आणि सिंह या प्राण्यांचा समावेश असलेल्या क्लिष्ट शब्दांचा वापर करून आपण कोणीतरी थोर लेखक असल्याचे वातावरण निर्माण करणे काही सोपे काम नव्हे. आता तुम्ही मला टपरी वरचा छपरी लेखक समजण्याची चूक चुकूनही करू नका. त्याने काय होईल ते पण सांगतो. अलंकारिक शब्दांत ,अर्थात पात्रता नसतानाही सुवर्ण अक्षरात शाल-श्रीफळ (स्लीपर वगैर म्हणणे टाळावे) बहाल करण्यात येईल. थोडक्यात काय तर काय नाय. झाला ना अपेक्षाभंग?
तुझ्यासारख्या टोमण्याकडून काय त्या अपेक्षा ठेवायच्या त्यापेक्षा Tik Tok चे व्हिडीओ पाहण्यात समाधान मानेन..! असे तुम्ही मला माझ्या मागेही बोलू नका कारण माझ्या मागे साडेसाती देखील आहे त्यामुळे तिचा प्रकोप तुमच्यावर झाला तर त्याला जबाबदार मी नव्हे.
-आपला शुभ्र चिंताजनक
तर्कटक
Comments
Post a Comment