थांबा !
ही कविता कविता नाही
इथे कोणते कवितापण नाही.
यात कुठे कागद आणि
शाईचा वापर नाही.
स्वैर यमकाची उधळण
तर नाहीच नाही.
रक्ताने किंवा घामाने तर
मुळीच लिहलेली नाही.
यात प्रेयसीला सर्वमान्य
उपमान चंद्राची
उपमा दिलेली नाही.
उगाच त ला त आणि म ला म
जोडलेले नाही.
कुठेही भारदस्त शब्द
वापरण्याचा मोह नाही.
अन्याय होतोय ,तो मी पाहतोय
पण त्या विरोधात आवाज
उठण्याचा प्रयत्नही नाही.
आणि हो सांगायचं राहीलं,
मी कवी कवी नाही.
कारण ही कविता कविता
नाही..!
Comments
Post a Comment