सर

नाद गंध रंग रूप स्पर्ष या संवेदनांची लयलूट म्हणजे पाऊस आणि अश्या या संवेदनशील पावसात तिची आठवण येणार नाही असं कधी झालंय का? सरीवर सरींचा सारीपाट खेळणाऱ्या पावसात तीचं माझ्यासोबत असणं म्हणजे घनदाट अरण्यात मिणमिणत्या कंदिलाच्या प्रकाशात दिसणारी इवलीशी झोपडी. तिची सर त्या पावसाच्या सरीना येणार नाही हे मात्र तितकेच खरे.. अहं अहं अहंम हरभऱ्याची भर करत नाही आहे. काळ्याकभिन्न ढगांना लाजवेल अशी ती त्याच रंगातील..
          ती सोबत असते तेव्हा मी खूप सुखावतो...! मी मात्र तिच्याशी खूप कठोर वागतो. गरज असेल तेव्हाच तिला हाक मारतो.  मग इथे एक गोष्ट खरी ठरते ती आणि मन उघडलं नाही तर ते कायमच ओझं म्हणून राहतं.  ! अशी ती छत्री तिला नाही देऊ शकत निस्वार्थी प्रेमाची खात्री....

Comments