बाष्प कल्पना

कित्येक लोकांना माझे विनोद कळत नाहीत मग ते त्याला पाणचट अशी खुळचट टिप्पणी देतात. माझा विनोद हा बुद्धिग्राह्य आणि हृदयग्राह्य अश्या दोन्ही प्रकारच्या विनोदांचा मनोज्ञ आणि अभ्यासपूर्ण संगम असतो. विनोदाचं तत्वज्ञान आणि सत्वज्ञान आत्मसात केलेल्यांना माझा विनोद प्रसन्नतेच्या उच्च पातळीवर आपोआप नेऊन सोडतो. बाष्कळपणा आणि बाष्प कल्पना या दोन्ही संज्ञा काहीश्या भिन्न पण तितक्याच एकमेकांना जवळच्या ; माझ्यादेखील...😁
अभिरुचीपूर्ण विनोदनिर्मितीचे शास्त्र सहस्त्र प्रयत्नांती प्राप्त केले आहे. कोणतीही निर्मिती सोबत एक स्वतंत्र अर्थ घेऊन येत असते.(या वाक्याला काही अर्थ नाही असे बोलणे अर्थहीन ठरेल.)
पण या सगळ्या प्रपंचात कार्लइल म्हणतो कसा,
 "In cheerful soul there is no evil."
मला न विचारता माझे नाव समीर ठेवले गेले आहे.

Comments